मुंबई इंडियन्स ही इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रेंचायझी आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएलचे विकेटपद पटकावले. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं. आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने मुंबई इंडियन्सने त्यांची नवी जर्सी देखील लाँच केली आहे.
गुरुवारी 12 डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्सने येत्या सीजनसाठी त्यांची नवी जर्सी लाँच केली. यंदाची जर्सी देखील निळ्या रंगाची असून त्यावर काही सोनेरी रंगाच्या रेषा आहेत. मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर आयडीएफसी बँक आणि लॉरिट्झ नुडसेन यांचा लोगो असून डाव्या बाजूला मुंबई इंडियन्सचा लोगो देखील लोगो आहे. लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन हे यंदा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे भागीदार असणार आहेत.
त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर समोरच्या बाजूला त्यांचे नाव नव्या जर्सीवर पाहायला मिळतंय. मुंबई इंडियन्सने नवीन जर्सी लाँच केली खरी मात्र ही जर्सी पाहून चाहत्यांना फारसा आनंद झालेला दिसत नाही. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचा व्हिडीओ शेअर केल्यावर त्याच्याखाली कमेंट करून काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ : रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रॉबीन मिन्झ, करण शर्मा, रायन रिकेल्टन, अल्लाह गाझनफर, अश्वीन कुमार, मिचेल सॅण्टनर, रेस टॉप्ले, श्रीजित कृष्णन्, राज अंगद बावा, सत्य नारायण राजू, बिवेन जॅकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिजाड विल्यम्स, विग्नेश पुथ्थूर, नमन धीर, विल जॅक्स, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट