जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो जप्त

सांगोला(sangola) विनापरवाना क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची (animals)90दाटीवाटीने व निर्दयीपणे वाहतूक करताना नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी टेम्पो पकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत २० वासरांची सुटका करण्यात आली असून,१० लाखांचा टेम्पो जप्त केला. हि कारवाई गुरुवारी पहाटे २. ३० च्या सुमारास सांगोला ते कडलास जाणाऱ्या रस्त्यावर केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम नदाफ यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आदित्य संजय भालसिंह (दोघेही रा. वाळकी,ता. अहिल्यानगर,जि. अहिल्यानगर ) यांच्याविरुद्व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. दोघेजण मिळून त्यांच्या ताब्यातील एमएच -१६-सीडी-३६७२ या टेम्पोच्या पाठीमागील हौदात काळ्या , पांढऱ्या रंगाच्या २०जर्सी गाईच्या कालवडी क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबून त्यांना वेदना होईल, अशा परिस्थितील कमी रुंदीच्या जागेत लोखंडी अँगलला बांधून चार-पाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नसताना त्यांचे अमानुषपणे निर्दयीपणे कोंबून वाहतूक करत असताना मिळून आले.