पट्टणकोडोली जिल्हा परिषदेवर भगवा फडकवूया; शिवाजी जाधव

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील पट्टणकोडोली व रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला. ग्रामीण भागातील युवकांच्या सहभागातून व संघटन बांधणीतून युवासेना अधिक मजबूत होईल.

तसेच शिवसेनेचा धगधगता विचार व मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुरू असलेले लोकहिताचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी युवासैनिक सज्ज असतील असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केला.

पद म्हणजे अधिकची जबाबदारी या जाणिवेतून पदाधिकाऱ्यांनी संघटना ताकदीने उभी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.