विट्यात पोलिसांची मोठी कारवाई, पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले

विटा भिवघाट रस्त्यालगत असणाऱ्या बेनापूर गावच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल वापरणाऱ्या एका तरुणावर सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या मोठ्या कारवाईत खानापूर तालुक्यातील हिवरे येथील किशोर विलास जाधव वय बावीस या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल गुरुवार १२ डिसेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजन्याच्या सुमारास बेनापुर हद्दीत भिवघाट रस्त्यावर एक तरुण संशयास्पद रित्या फिरताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकास निदर्शनास आला. यावेळी या तरुणाची चौकशी करत झाडाझुडती घेतली असता सदर तरुणाकडे एक लोखंडी पिस्तल आणि मॅक्सीन असा सुमारे 55 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

तरुणाकडे अधिक चौकशी केली असता हे पिस्तल विनापरवाना बेकायदेशीर असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे बेकायदेशीर पिस्तूल वापरण्याप्रकरणी किशोर जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.