नृत्यचक्र’मध्ये इचलकरंजीतील ५० नर्तिकांचा सहभाग

इचलकरंजी येथे राज्यातील २० शहरांमधील तब्बल १९८८ कथक कलाकारांनी एकत्रितरित्या ‘नृत्यचक्र’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये इचलकरंजीतील पदन्यास नृत्यकला अकादमीच्या नृत्यगुरू सौ. सायली होगाडे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५० युवती आणि गृहिणींनी या उपक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्योती मन्सुखानी यांची असून कथक नृत्यांगना अस्मिता ठाकूर
नृत्यचक्र उपक्रमात सहभाग घेतलेल्या महाराष्ट्राच्या विविध भागातील नृत्यकलाकार मान्यवर.
यांच्या साथीने ती प्रत्यक्षात उतरली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कथक नृत्याची नोंद व्हावी म्हणून केला गेलेला हा एक प्रयत्न होता. यावेळी परीक्षक म्हणून निनाद देशमुख, अभय ठकार, डॉक्टर संतोष गोसावी आणि विजया जोशी हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन अमोद कुलकर्णी यांनी केले होते. या कार्यक्रमामध्ये १८ ते ६३ वयोगटातील कथक
साधक सहभागी झाले होते. वीस मिनिटेसलग एकत्रित नृत्य केल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमधून कथक नृत्यावर आधारित मीरा भजन, तराना, कालभैरवाष्टकम, देवी द्रुपद अशा विविध रचनांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पदन्यासच्या सर्व नृत्य कलाकारांनी आपल्या स्वतंत्र सादरीकरणात सुरेखपणे गणेश वंदना सादर केली. नृत्यचक्र उपक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना तेजस्विनी साठे, डॉक्टर माधुरी आपटे आणि रसिका गुमास्ते यांनीही सक्रिय सहभाग दर्शविला.