नुकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांच्या हाती आला आणि महायुतीने यामध्ये विजय प्राप्त केला. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुहास भैया बाबर यांनी प्रचंड मताधिक्य मिळवून बाजी मारली आणि त्यांनी नुकतीच आमदारकी गोपनीयतेची शपथ देखील घेतली. सुहास भैया बाबर आमदार व्हावेत आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून यावेत यासाठी आटपाडी पाटील मळा रामनगर व करंगणी गावातील शिवसेना (शिंदे गट) मधील लाडक्या बहिणींनी नवस केले होते.
लाडक्या बहिणींनी केलेले नवस ६ डिसेंबर ते सात डिसेंबर रोजी आटपाडी महामंडळाच्या लालपरीतून प्रवास करून आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मनीषा तानाजीराव पाटील व सौ. विजया शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने तुळजापूरची महालक्ष्मी, अक्कलकोट स्वामी समर्थ, गाणगापूर दत्त मंदिर व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर या सर्व देवी देवतांच्या मंदिरात जाऊन नवस पूर्ण केलेले आहे. हे नवस फेडण्यासाठी 50 होऊन जास्त लाडक्या बहिणींनी सर्व देवांना घातलेले नवस फेडून पूर्ण केले.
आटपाडी तालुक्यातील बहिणींनी भावासाठी देवी देवतांना केलेले नवस फेडून आमदार सुहास भैया यांच्या पुढील कार्यासाठी आशीर्वाद मागितले. या लाडक्या बहिणींची तालुक्यात सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये करगणी गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. कांचन जगदाळे, शोभा जगदाळे, पूनम जगदाळे, संजीवनी जगदाळे यांच्यासह तालुक्यातील पन्नास हून अधिक महिला सहभागी होत्या. नूतन आमदार सुहास भैया बाबर यांच्याकडून या सर्व लाडक्या बहिणींचे कौतुक करण्यात आले आहे.