खिशाला कात्री लागणार! जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार

नव्या वर्षात केशकर्तनालय, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर (Beauty Parlors And Salons Rates) असोशिएशनने घेतलाय. जानेवारी 2025 पासून ही दरवाढ होणार आहे. वाढती महागाई, जीएसटी महापालिकेने वाढलेलं परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. सलून आणि ब्युटीपार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30 टक्क्यांची भाववाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 

कुठल्या गोष्टींचे दर किती वाढणार? 

हेअर कट- 20 टक्के वाढ 
दाढी- 20 टक्के वाढ
हेअर कलर- 30 टक्के वाढ
क्लीन अप,फेशियल अँड डी टॅन- 30 टक्के वाढ
स्मुथनिंग अँड कॅरीटीन- 30 टक्के वाढ
हेड मसाज, मेनिक्यूर, पेडीक्युर- 30 टक्के वाढ