आजपासून (1 मार्च) नवीन मार्च (March) महिना सुरु झाला आहे. या महिन्यात बँकांचे व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण या चालू महिन्यात तब्बल 14 दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. विविध सणाच्या निमित्तानं बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळं बँकांचे व्यवहार करण्यापूर्वी ही संपूर्ण यादी वाचा आणि मगच पुढं च नियोजन करा. जाणून घेऊयात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद.
भारतीय रिझर्व्ह बँक नवीन महिन्याच्या सुरुवातीपूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. आजपासून मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयने नवीन महिन्यासाठी बँक सुट्टीची यादी जाहीर केली आहे. जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करायचे असेल, तर बँकांना सुट्ट्या कधी येतील हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. बँक ही एक आवश्यक वित्तीय संस्था आहे. अशा स्थितीत बँकांमध्ये दीर्घकाळ सुट्टी राहिल्यास अनेक महत्त्वाची कामे रखडतात. मार्चमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये सणांनिमित्त अनेक दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. महाशिवरात्री, होळी (होळी 2024), गुड फ्रायडे (गुड फ्रायडे 2024) आणि शनिवार, रविवार या सुट्ट्यांमुळे मार्चमध्ये एकूण 14 दिवस बंद राहतील. वेगवेगळ्या राज्यांनुसार या सुट्ट्या ठरवल्या जातात.
मार्च 2024 मध्ये कोणत्या दिवशी बँका राहणार बंद?
01 मार्च 2024 – छप्पर कुटमुळे आयझॉलमधील बँकांना सुट्टी असणार
03 मार्च 2024 – रविवार
8 मार्च 2024- महा शिवरात्रीमुळं अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरु, चंदीगड, डेहराडून, कोची, लखनौ, मुंबई भोपाळ, भुवनेश्वर, हैदराबाद, जम्मू, कानपूर,नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद राहतील.
9 मार्च 2024 – दुसरा शनिवार
10 मार्च 2024- रविवार
17 मार्च 2024- रविवार
22 मार्च 2024- बिहार दिनानिमित्त पाटण्यात बँका बंद राहतील
23 मार्च 2024- चौथा शनिवार
24 मार्च 2024 – रविवार
25 मार्च 2024- होळीमुळे बंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोहिमा, पाटणा, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम वगळता संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
26 मार्च 2024- भोपाळ, इंफाळ, पाटणा येथे होळी किंवा याओसांग दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
27 मार्च 2024- पाटण्यात होळीमुळे बँका बंद राहतील.
29 मार्च 2024- गुड फ्रायडेमुळे आगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असेल.
बदलत्या काळानुसार बँकांच्या कार्यपद्धतीत बरेच बदल झाले आहेत. बँका बंद असतानाही, तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि UPI द्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम वापरू शकता.