आठवडी बाजारात गस्त वाढविण्याच्या आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिल्या सूचना

गेल्या काही महिन्यांपासून सांगोला पोलिस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या दागिने, मोबाइल हिसकावणे, पाकीट मारणे, घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सांगोल्याच्या आठवडी बाजारांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. सांगोला येथील आठवडी बाजार हा रविवारी असतो आणि या आठवडी बाजारांमध्ये मोबाईल, पर्स, चोरी होण्याचे सत्र हे सुरूच आहे. आठवडी बाजार हा चोरी करणाऱ्या चोरट्यांसाठी पर्वणीच ठरलेला आहे. त्यामुळे सांगोला शहरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. या धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना सूचना दिल्या आहेत. सांगोल्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस प्रशासनाने गस्त वाढविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सर्वानाच शांत व सुरक्षित सांगोला पुन्हा दिसायला हवा यासाठी तालुक्यातील गुन्हेगारी मुळासकट नष्ट करा, अशा कडक सूचना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.