राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखलपूर्व आणि न्यायालयात प्रलंबित अशी २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधून ४ कोटींपेक्षा अधिक रुपयांची वसुली करण्यात आली.हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. ए. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे येथील न्यायालयात आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय लोकन्यायालयात वित्तीय संस्था आणि बँकांची दाखलपूर्व ६ हजार ६०९ व न्यायालयात प्रलंबित २ हजार २८० प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यातील दाखलपूर्व प्रकरणातील ५३ आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी १५८ अशी एकूण २११ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
इचलकरंजीमध्ये २११ प्रकरणे निकाली
