Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला, पुढचे दोन दिवस अलर्ट

दोन दिवसांपासून महाराष्ट्र थंडीने कुडकुडला आहे. हाडं गोठवणारी थंडी पडत आहे. त्यामुळे राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे, पुढील चार दिवस थंडी टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मागील दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पहाटे ५ वाजताचे किमान तापमान बऱ्याच ठिकाणी एक अंकी संख्येवर आले. तापमाने सरासरीपेक्षा २ ते ६ डिग्रीपर्यंत घसरले. जळगाव अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बुलढाणा, धाराशिव, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा ह्या सर्व जिल्ह्यात ह्या दोन दिवसात थंडीची लाट व काही जिल्ह्यात थंडीची लाटसदृश्य स्थितीची शक्यता जाणवते.