हातकणंगले तालुक्यातील आळते येथील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीची यात्रा उदगं आई उदंच्या जयघोषात सुती चौडक्याच्या निनादात व खारीक खोबरे भंडा याच्या उधळणीत उत्साहपुर्ण वातावरणात हजारो भक्तांच्या उपस्थित उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पहाटे श्री रेणुका, श्री मातंगी, श्री परशुराम मंदिरातील मृर्त्यांना अभिषेक घालून आकर्षक पुजा बांधण्यात आली होती.
काकड आरती नंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केले. रात्री १२ वाजता देवीची पालखी गाव भेटीसाठी आली. ग्रामस्थांनी देवीची खणा नारळाने ओटी भरून मोठ्या भक्तीभावाने पालखीचे दर्शन घेतले. यानंतर पालखी यात्रेत पोहचली. याठिकाणी भाविकांनी पालखीवर खारीक, खोबरे, भंडाऱ्याची उधळण करत उदगं आई उदंचा जयघोष केला. खाईलच्या ठिकाणी कांकण फोडण्याचा विधी पार पडला. पालखीने मंदिर प्रदक्षिणा परिक्रमा केल्यानंतर यात्रेची सांगता होऊन मंदिराचे दरवाजे दर्शना साठी बंद झाले.