पेठवडगावात ठाकरेंची तोफ धडाडणार!

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक गावागावांत नेते मंडळी आपले प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. गावभेटी, सभा यांचे नियोजन करण्यात प्रत्येक पक्ष हा व्यस्त आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारासाठी रविवारी म्हणजेच 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता नगरपालिका चौक पेठ वडगाव येथे युवा नेते आदित्य ठाकरे येणार आहेत.