आयजीएम रुग्णालयात सीसीटीव्ही, वाहनतळासाठी ८४ लाखाचा निधी मंजूर 

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी ६० लाख रुपये आणि रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, अन्य पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनतळ उभारण्यासाठी २४ लाख असा ८४ लाख रुपयांचा निधी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून मंजूर करण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण रुग्णालयात व रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी ६० लाख ३१ र हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर या रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मोठी असून त्यांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने आवारात लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे प्रसंगी रुग्णसेवेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वे वाहनतळाची गरज ओळखून आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी वाहनतळ उभारणीबाबत मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नातून वाहनतळ – बांधण्यासाठी २४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्णालयात उपलब्ध होणाऱ्या सुविधा आणि उपचारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. लवकरच हे रुग्णालय परिपूर्ण सुसज्ज असे बनेल आणि येथे दाखल होणाच्या कोणत्याही रुग्णाला न उपचाराविना परतावे लागणार नाही, असे आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले.