डी. डी. जगताप हा माझा बालपणापासूनचा मित्र असुन त्याने सन्गोल्यातील नाट्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे सांगोला रोटरी क्लबने औचित्य साधून योग्य माणसाचा सन्मान केला आहे, असे गौरवोद्गार सांगोला तालुका शिक्षण मंडळाचे खजिनदार शंकरराव सावंत यानी काढले. सांगोला रोटरी क्लबने आयोजित केलेल्या रंगकर्मी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सांगोला रोटरी क्लबने रंगकर्मी दिनानिमीत्त रो. इंजि. मधुकर कांबळे यांच्या कार्यलयात कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सावंत बोलत होते. सावंत यानी जगताप व त्यांच्या मैत्रीचे पदर उलगडून दाखवताना दोघानी मिळून केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. जगताप हे स्टेजसमोर अभिनय करणारे कलाकार होते तर मी पडदयामागे चेहर्याला रंग लावण्याचे काम करत असल्याची आठवण सावंत यांनी करून दिली. सांगोला रोटरी क्लब तर्फे जगताप यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाब्दल रंगकर्मी दिनानिमीत्त सत्कार करण्यात आला. रो. प्रा. राजेंद्र ठोंबरे यानी त्यांच्या शालेय जीवनात गुरुवर्य जगताप यानी काम केलेल्या नाटकाची यादी सांगुन त्यांच्या शैक्षणिक व चैतन्य हास्ययोग मंडळातिल कार्यावर प्रकाश टाकला. यामध्ये सांगोला. विद्यामंदिरच्या बांधकामाच्या निधी संकलनासाठी सत्तरच्या दशकात शिक्षकांना नाटक बसविण्याची प्रेरणा गुरुवर्य बापुसाहेब झपके यानी दिली होती.
त्यामुळे त्या काळात जगताप सर, सावंत सर यानी भाग घेतलेल्या नाटकाची यादी ठोंबरे यानी सादर केली. कवडीचुंबक, अपराध मीच केला, अश्रूची झाली फुले, दिवा जळू दे सारी रात, विच्छा माझी पुरी करा, सौजन्याची ऐशी तैशी, यमराज्यातील एक रात्र, अडला नारायण अशा नाटकात जगताप व सावंत यानी केलेल्या कामाची आठवण करुन दिली. डॉ. कृष्णा इन्गोले यानी जगताप यांच्या संपूर्ण जीवन प्रकाशावर भाष्य करून त्यानी सुरु केलेल्या घाडगे पाटील ट्रान्स्पोर्ट या व्यवसायाची माहिती दिली. तसेच त्यानी लिहिलेले व जगताप सर यांचा लेख असलेले प्रिय गुरुजन हे पुस्तक रोटरी क्लबला भेट दिले. या प्रसंगी भागवत पैलवान, विलास पाटील सर यानी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना जगताप यानी कृतज्ञता व्यक्त करुन सांगोला विद्यामंदिर, नाट्य, फोटोग्राफी, क्रिडा, या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सेवानिवृत्ती नंतर चैतन्य हास्य क्लबचे कार्य सुरु असल्याचे सांगितले. रोटरी अध्यक्ष इंजि. विकास देशपान्डे यानी सांगोला रोटरी क्लबच्या उपक्रमाची माहिती देवून उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. रो. इंजि. विलास बिले यानी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी रो. इंजि. अशोक गोडसे, रो. शरणाप्पा हळ्ळीसागर, म.शं. घोंगडे, पांडुरंग भुइँटे, विश्वेश्वर कोठावळे, बाळासाहेब मेटकरी. प्रा. उत्तमराव घाटुळे, उत्तम पाटोळे, आदि उपस्थित होते.