खोतवाडीत युवकाचा निर्घुण खून….

सध्या अनेक गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळतच आहे. तर हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथील एका बारसमोर मयूर दीपक कांबळे या युवकाचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घुण खून केलेला आहे.

हा खून पूर्व वैमन्यसातून घडला असल्याचे तपासात समजले आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सदरच्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते.