सालाबाद प्रमाणे महुद बु!! गावाची श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उस्ताहात पार पडली. श्री खंडोबा देवाच्या यात्रेची सुरुवात वाजता गाजत निघालेल्या पालखीने झाली ही पालखी महुद गावातील राजे उमाजी नाईक नगर येथील श्री खंडोबा मंदीरातुन सालाबाद प्रमाणे निघत असते पालखीमध्ये अनेक भावीकास यात्रा कमेटी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सदर यात्रेमध्ये लहान मुलांसाठी वेगेगळे पाळणे, तसेच उंच असा आकाश पाळना, मनोरंजनाचा सांस्कृतीक कार्यक्रम तसेच खवय्यांसाठी मिठाईच्या दुकानांची रेलचेल होती. तसेच खेळणी व सौंदर्य प्रसादनांच्या दुकानांना महीलांनी मोठी गर्दी पहावयास मिळाली. महुद येथील यात्रा ही खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. आज मितीला खिलार जनावरांची संख्या कमी झालेली असताना व खिलार जनावरे पाळणे हे फार खर्चीक झाले असताना काही पशुपालक आजही खिलार जनावरे पाळत आहेत.
आशा खिलार जनावरांची निवड प्रक्रीया पार पाडली गेली सदर निवड पशुवैद्यकीय अधिकारी व पशुतज्ञ यांच्या माध्यमातुन केली गेली व निवडीमध्ये सहभागी झालेल्या अनेक वळु बैल, गायी, खोंड, कालवड व रेडा यांच्या मधुन योग्य त्यांना प्रथम, द्वितीय, चतुर्थ क्रमांक निवडण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणुन विज्ञान प्रर्शनाचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जलशुध्दीकरण, पाणी आडवा पाणी जिरवा, ज्वालामुखी, चंद्रयान ३ याच्या प्रतीकृती विद्यार्थ्यांनी हुबेहुब बनवल्या होत्या. याही प्रदर्शनातील सहभाग झालेल्यांचे प्रथम द्वितीय, तृतीय चतुर्थ क्रमांक निवडुन त्याही विद्याथ्यांना योग्य ते बक्षीस व प्रशस्ती पत्रक देण्यात आले. सदर बक्षीस वितरण समारंभाचे उद्धघाटन शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत (भैया) देशमुख उपस्थित यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन तसेच फित कापुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बाळासाहेब (काका) पाटील होते. प्रमुख पाहुणे भाई रमेश जाधव, भाई समाधान पाटील, मा.सुर्यकांत घाडगे, भाई ‘तुकाराम भुसनर सर भाई अनील खरात, भाई दादासो जगताप इत्यादी मान्यवर होते. प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत सरतापे, दादासो महाजन, भाई शंकर पाटील, कल्याण लुबाळ, संजय जाधव, अड. धनंजय मेटकरी, दादासो जाधव, रामचंद्र चव्हाण, धनंजय नागणे, शिवाजी मोरे, लिंगराज येडगे, दावतराव कांबळे, अशोक येडगे, डॉ. पोपट कारंडे, संतोष पाटील, शिवाजी कोळेकर, बाळासाहेब ढाळे, हरीभाऊ येडगे, जयंत बाबर, भागवत सरतापे, गजेंद्र सरतापे, राजेंद्र देशमुख, देवीदास गोफणे, राहुल नागणे, संतोष देशमुख, प्रकाश येडगे, दामु मोरे, नानासो गाढवे, विजय चव्हाण, संदीप पाटील, बापु केसकर, नामदेव कोळेकर, मा. अंकुश मेटकरी, दत्ता डोंगरे, हनुमंत डोंगरे, आबा बंडगर, रावसाहेब डोंगरे, प्रल्हाद जाधव, सतिश अर्जुन, विकास सरतापे, उमेश खरात, लहु येडगे, शंकर लवटे, बंटी लवटे, फिरोज हवालदार सुधिर बाजारे, नेताजी पाटील, विक्रम पाटील, अजीत कांबळे यांच्या सहित अनेक नेते पदाधिकारी व पशुपालक शेतकरी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सदर यात्रा पार पाडण्यासाठी चेअरमन सौ. सविता सुखदेव येडगे व्हा.चेअरमन सौ. वर्षा धनंजय महाजन सचिव महादेव सखाराम येळे, खजिनदार सौ.वनिता संजय कोळेकर तसेच व्यवस्थापक म्हणुन सरपंच सौ संजिवनी कल्याण लुबाळ, सदस्य संजय शिवाजी पाटील, सदस्या मी सौ. आशाबाई दौलत कांबळे सदस्या सौ. मालन तुकाराम आटपाडकर, तसेच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे व लिपिक संदिप बाबर व गारामपंचायत कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेऊन यात्रा सुरळीत पार पाडली.