Team India : टीम इंडियाची 22 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिका, पहिला सामना कुठे?

वूमन्स टीम इंडियाने विंडीजवर गुरुवारी 19 डिसेंबरला तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन हे 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हरमनप्रीत कौर ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

हेली मॅथ्यूज ही विंडीजंची कॅप्टन्सी करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळ दोन्ही संघांना अधिकाअधिक वेळ सरावाला देता येणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे बडोद्यातील रिलायन्स स्टेडियममध्ये होणार आहेत.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार 22 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

दुसरा सामना, मंगळवार 24 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

तिसरा सामना, शुक्रवार 27 डिसेंबर, रिलायन्स स्टेडियम, बडोदा

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि रेणुका सिंह ठाकुर.

वनडे सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.