खानापूर तालुक्यात खळबळ! फेसबुक, इंस्टाग्राम वरून बनावट अकाउंट…..

अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा प्रचंड प्रमाणावर वापर सुरू असून त्याचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटे आहेत. असे असताना सोशल मीडिया वापरताना बरीच काळजी घ्यावी लागते. खानापूर तालुक्यात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नुकतेच विटा पोलीस स्टेशन येथे फेसबुक व instagram वर बनावट अकाउंट तयार करून त्यावरून मुलीचे लग्न छायाचित्र प्रसिद्ध केले व मुलीची बदनामी केली. सदर प्रकार हा अत्यंत खळबळजनक असून मुलीचे वडील राहणार वाळूज यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एका पोलिसात फिर्याद दिली आहे. आता विटा पोलिसांसमोर अज्ञात आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे.