मिरजेत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या!

मिरज शहरातील ब्राह्मणपुरी, ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली या परिसरात कोयता आणि तलवारी नाचवत कोयता गँगने दहशत निर्माण केली. एका चारचाकीसहित २५ दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. घरावर कोयत्याने वार केले आणि दगडफेक करून दरवाजा तोडण्यात आला. याप्रकरणी सहा जणांवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी सौरभ पोतदार, कुणाल वाली, वंश वाली आणि काळे यांना अटक करण्यात आली आहे. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून सहा हल्लेखोरांनी हातात तलवारी आणि कोयता घेऊन येऊन ढेरे यांच्या घरासमोर दहशत निर्माण केली. मोटारसायकलवर हल्ला करून गाडीचे नुकसान केले. घराच्या, गॅलरीच्या दिशेने दगड आणि विटा फेकल्या.