परभणी येथे संविधानाचा अवमान घडला त्या प्रकरणाच्या निषेधार्थ आटपाडी तालुका नाभिक संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. संघटनेच्या वतीने आटपाडी तहसीलदार श्री. मनोज कुमार आयटवडे व आटपाडी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय राजीव केंद्रे यांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. तसेच अटक झालेल्या आरोपीची नार्को टेस्ट घेऊन त्यांच्या पाठीमागील सूत्रधारांचा पर्दाफाश करण्याची मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली. संविधान अवमानाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी देखील या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
परभणीतील संविधान अवमानप्रकरणी आटपाडी तालुका नाभिक संघटनेकडून निषेध
