राजेंद्र अण्णांनी भरला उमेदवारी अर्ज! बिघडली राजकीय गणिते …..

राजेंद्रअण्णा देशमुख यांनी विट्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलेले आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने राजेंद्रअण्णा देशमुखांनी अपक्ष म्हणून अर्थ दाखल केला आहे. अर्ज भरताना राजेंद्रअण्णा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी शंकर नाना मोहिते यांनी राजेंद्र अण्णा देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राजेंद्र अण्णांच्या उमेदवारीमुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात आणखी चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील राजेंद्र अण्णांची नाराजी दूर करणार का? याकडे आता मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.