आटपाडी तालुक्यातील करगणीतील खिलार जनावरांच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांचा प्रतिसाद 

आटपाडी तालुक्यातील करगणी येथील श्री लखमेश्वर देवाची महाशिवात्री खिलारी जनावरांच्या यात्रेनिमित्त खिलार जनावरांचे प्रदर्शन सोमवारी भरविण्यात आले होते. यामध्ये तीन गटात नंबर काढण्यात आले विजेते शेतकऱ्यांना पारितोषीक व बक्षीस कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत करगणी यामध्ये मार्फत देण्यात आली. या प्रदर्शनासाठी कनार्टक, आंध्रप्रदेश यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी उपस्थित होते. या खिलार जनावरांच्या प्रदर्शनाला निरिक्षक यांच्याकडून विजेत्यांचे नंबर काढण्यात आले होते.

पांढरा गट अर्जुन कांबळे, अनिल सुर्यवंशी, महादेव गरडे, कोसा गट सुजल सरगर, तानाजी कांबळे, जगन्नाथ सरगर, शुभम पांढरे, किसन कोळेकर, हर्षद तोरणे, सुनिल सरगर, आबासो कांबळे, तानाजी कांबळे, हणमंत गवळी, कोसा गट आप्पासो सरगर, बिरा सरगर, राहुल सरगर, दत्तात्रय जाधव, साहेबराव पाटील, म हादेव गरड, करीम शेख, समाधान सरगर, राजेश गायकवाड, विरा सरगर यांनी विजेते झाले. यावेळी सभापती संतोष पुजारी, सरपंच सुरेखा व्होनमाने, उपसभापती सुनिल सरक, साहेबराव पाटील, सुबराव पाटील, राहुल गायकवाड, माणिक गाढवे, विठ्ठल गवळी, सुनिल तळे, दादासाहेब सरगर, सचिव शशिकांत जाधव, सहसचिव नारायण ऐवळे, तात्यासाहेब व्होनमाने, धनाजी खिलारी उपस्थित होते.