बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सांगोला येथे अमित शहा यांचा जाहीर निषेध

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातील चालू सत्रात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याने त्यांच्या निषेधार्थ बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने अमित शहा यांच्या निषेधाचे निवेदन सांगोला तहसीलदार मा संतोष कणसे व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना देण्यात आले. यावेळी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनोद उर्फ  कालिदास कसबे, सांगोला तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर यादव, प्रशांत चंदनशिवे, स्वप्निल माने, बंडू माने, सागर जगधने, अमित कसबे, दादासो पाटोळे, सात्विक नवघरे, अमोल नवघरे, हर्षद मागाडे, साहिल मागाडे, प्रथमेश मागाडे, संग्राम भोसले, बंडू माने, प्रतीक गडहिरे, शुभम गडहिरे, जया सावंत, उज्वला बोराडे, प्रदीप चंदनशिवे, विद्या माने, शुभम भडकुंबे व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.