राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियनांतर्गत विभागीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.तर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आज या अभियानाचा निकाल जाहीर झाला. याशिवाय, जिल्ह्यातील धरणगुत्ती, शेळकेवाडी, अंबप आणि अर्जुनी या चार ग्रामपंचायतींनाही राज्य व पुणे विभागात बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावत ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. धरणगुत्ती (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर लोकसंख्येच्या निकषावर ७५ लाख रुपये, शेळकेवाडी (ता. करवीर) ५० लाख रुपये आणि अर्जुनी (ता. कागल) ग्रामपंचायतीने १५ लाखांचे बक्षीस पटकावले आहे.
हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत मिळवले ५० लाख रुपयांचे बक्षीस!
