हातकणंगलेत शिवसेना ठाकरे गटाचे तीव्र आंदोलन

 हातकणंगले, बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या व ७४८ गावांचे अध्यत्मिक श्रध्दास्थान असलेल्या नांदणी मठाच्या हत्तीला पेटा संस्था गुजरातला नेईपर्यंत राज्य सरकारने बघ्याची भुमिका घेऊन धार्मिक भावना दुखावल्याच्या निषेधार्थ व पेटा संस्थेने कोणाच्या तरी हितासाठी हिंदू धर्माच्या धार्मिक, सांस्कृतीक परंपरेत चालवलेली लुडबुड त्वरीत थांबवावी व पेटा संस्थेवर कठोर निर्बंध लावावेत या मागणीसाठी शिवसेना (Shiv Sena)ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले येथे सांगली – कोल्हापूर रस्त्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले.

 यावेळी उपनेते संजय पवार, सह संपर्क विजय देवणे, राज्य संघटक नवेज मुल्ला, जिल्हाप्रमुख वैभव उगळे, युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदूम, तालुका प्रमुख बाजीराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर नायब तहसिलदार संदिप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात संदिप दबडे, महेश चव्हाण, साताप्पा भवान, नामदेव गिरी, अनिल खवरे, बाबा पाटील, दत्ता पवार, सयाजी चव्हाण, धनाजी मोरे, उमेश पाटील, शिवाजी पाटील, युवराज घोरपडे, बाबासाहेब शिंगे, रवी निंबाळकर, संदीप पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.