हुपरीत आटणीच्या दुकानात कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या 

विलास सुर्यवंशी हा जालिंदर पाटील रोड हुपरी येथील धनराज सुर्यवंशी यांच्या आटणीच्या दुकानात कामाला होता. दुकानाची चावी विकास याचेकडे असल्याने अपरात्री त्याने दुकानात जाऊन आतून दाराला कडी लावून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दुकानातील लाकडी बडोद्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे. 

सकाळच्या सुमारास शेजारच्या लोकांना बोळातून खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याने तात्काळ संबंधित दुकानदार व पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी पोलिस दाखल झाले. यावेळी दार उघडले नसल्याने घराच्या छपरावरील खापऱ्या काढून आत प्रवेश केला. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याची वर्दी धनराज दिनकर सुर्यवंशी यांनी दिल्याने हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.