पूरबाधित शेतकऱ्यांना ११ कोटींची भरपाई मिळावी आ. माने यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा…

हातकणंगले तालुक्यामध्ये जुलै २०२४ मध्ये पंचगंगा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामध्ये ८७०० शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तहसील कार्यालयाने पंचनामे पूर्ण केले. शासनाकडून ११ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झालेली आहे. असे असताना शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नसल्याचा औचित्याचा मुद्दा आमदार अशोकराव माने यांनी विधानसभेत उपस्थित केला.

हातकणंगले तहसीलचे ५६४६ शेतकऱ्यांना ४ कोटी ५७ लाख तर इचलकरंजी अपर तहसीलचे ४१४९ शेतकऱ्यांना ५ कोटी २९ लाखांची भरपाई मंजूर केली. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर भरपाई मिळाली नसल्याचा औचित्याचा मुद्दा आमदार अशोकराव माने यांनी विधानसभेत उपस्थित केला. वारणा- पंचगंगा नद्यांचे पाणी ज्या कुटुंबांच्या घराभोवती गेले होते त्यांनाही २०१९च्या शासन निर्णयाप्रमाणे दहा हजार रुपयांचे अनुदान मंजूर करावे हा प्रश्नही माने यांनी विधानसभेत मांडला.