महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात जाहीर केले की, राज्य सरकारची ‘ नमो शेतकरी महासन्मान योजना ‘ अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढवून १५ हजार रुपये करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या योजनेतून सहा हजार रुपये असे दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते.
मात्र, आता ही रक्कम वाढवून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘एक रुपयात पीक विमा योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.