इस्लामपुरात सोनसाखळी लांबवली

इस्लामपूर(Islampur) येथील बसस्थानकात बसमध्ये चढताना महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी चोरटयांनी लांबवली. हा प्रकार सोमवारी घडली याप्रकरणी जयश्री अशोक कारंडे (रा. बहे,ता वाळवा ) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . जयश्री या इस्लामपूर बसस्थानकातून बसने घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या . त्या बसमध्ये बसत असताना त्यांना गळ्यात साखळी नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोधाशोध केली. परंतु ती त्यांना मिळाली नाही.