बीट महिलांसाठी आरोग्याचा उत्तम खजिना

महिलांसाठी बीटचे अनेक फायदे आहेत . बीटचा (Beet) रस नियमित प्यायल्यास शरीराला पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. चला तर पाहूयात बीटचा रस महिलांसाठी कसा उपयुक्त आहे.

रक्ताची कमतरता पूर्ण करतो : बीटमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करतो. बीटरूटचा रस प्यायल्याने शरीराला लोह मिळते ज्यामुळे थकवा दूर होतो.

हार्मोन्स संतुलित ठेवतो : बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची पोषकतत्त्वं असतात. यामुळे स्त्रियांचा हार्मोनल बॅलेन्स राखला जातो. हार्मोनल असंतुलनामुळे होणाऱ्या त्वचेसंबंधी आणि मानसिक त्रासांपासून आराम मिळतो.

उर्जा वाढवतो : बीटमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात जे शरीरात जाऊन रक्तप्रवाह वाढवतात. ज्यामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि दिवसभर फ्रेश वाटतं.

हृदय निरोगी ठेवत : बीटमधील पोषकतत्त्व रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे बीटचा रस प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पचनसंस्था सुधारतो : बीटरूटमध्ये फायबर्सचे घटक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक पचनक्रिया सुरळीत ठेवतात. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांच्यासाठी बीट फायदेशीर आहे.