भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा, क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोक हिच्यासोबत झाला आहे. सानिया या मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून, लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा पूर्णपणे खाजगी पद्धतीने, फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सानिया चांडोक कोण आहे, तिच्याकडे एकूण संपत्ती किती आहे?, याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सानिया चांडोकने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. सानिया मुंबईतील एका मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहे. सानिया रवी घई यांची नात आहे. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचे कुटुंब आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी चे मालक आहेत. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार सानिया चांडोक ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून Mr.Paws Pet Spa and Store LLP कार्यरत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मूळ कंपनी ग्रॅव्हिस फूड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 624 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. हा मागील वर्षाच्या तुलनेत 20% जास्त होता. सानिया चांडोक ही मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीची नियुक्त भागीदार आणि संचालक देखील आहे.
अर्जुन तेंडुलकरने उरकला साखरपुडा, सानिया चांडोक प्रसिद्ध उद्योगपतींची नात
