इचलकरंजीत गुरुवारी श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे आगमन…..

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या परिक्रमेतील श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे गुरुवारी २६ डिसेंबर रोजी इचलकरंजी शहरात सकाळी ११ वाजता आगमन होत आहे. त्याचा सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पादुका सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्री चौंडेश्वरी मंदिर मंगळवार पेठ इचलकरंजी येथे दर्शनासाठी असणार आहेत.