इचलकरंजीत सुळकुड पाणी योजनेसाठी इनामंचे 30 सप्टेंबरला मूक मोर्चाचे आयोजन!

सध्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न खूपच जोर धरत आहे. इचलकरंजी शहरवासीयांना पाण्यासाठी खूपच वणवण करावी लागत आहे. दिवसेंदिवस इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला सुळकुड बांधारा पाणीयोजना मंजूर आहे. कागल परिसरातील राजकीय नेत्यांनी स्वार्थी राजकारण करून विरोध केल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झालेला आहे.

यासाठी इचलकरंजी नागरीक मंचने लाक्षणिक उपोषण केले. महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात 33 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. तर दीडशेहून संघटना व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. सुळकुड योजना कार्यान्वित व्हावी यासाठी इनामने २७ सप्टेंबर रोजी अन्नत्याग आंदोलन केले तर ३० सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन देखील केलेले आहे.