पीएम स्वनिधी योजनेंतर्गत आष्टा नगरपरिषदेच्या वतीने १२६५ पथ विक्रेत्यांची कर्ज प्रकरणे मंजूर केल्याची माहिती मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिली. मनोज कुमार देसाई म्हणाले, आष्टा शहरातील पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर होण्याकरिता स्वनिधी पंधरवडा योजनेचे योजन करण्यात आले. पीएम सोनी जनेंतर्गत ७४२ कर्ज प्रकरणाचे द्दष्ट दिले होते; परंतु आष्टा पालिकेने ईष्टापेक्षा जास्त १२६५ कर्ज प्रकरणे मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ दिला. पंधरवड्यात मख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयडीबीआय स्टेट बँक महाराष्ट्र बँक व कॅनरा बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत ज्या पथ विक्रेत्यांनी पूर्वीची कर्जे व्यवस्थित भरली आहेत त्यातील दहा हजार, वीस हजार, पन्नास हजार देण्यात आला. पीएम जीवनज्योती सुरक्षा योजना, श्रमयोगी मानधन योजना, वन नेशन वन रेशन कार्ड योजना अशा योजनेचा लाभ देण्यात आला तसेच क्यूआर कोड काढून दिले. जनजागृती रॅली काढून कर्ज प्रकरणाबाबत कॅम्प घेण्यात आला. यासाठी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते, नितीन दिघे, ऋतुजा मुळीक, शिरीष काळे, शंतनू माळी, प्रियांका भोसले यांचे सहकार्य लाभले