इचलकरंजीत ५ हजारांची लाच घेताना महावितरणचे २ कर्मचारी जाळ्यात

इचलकरंजी महावितरणचे दोन कर्मचारी ५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.रजाक तांबोळी आणि आकाश किते अशी अटक केलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांची नावे आहेत. चंदुर येथे पावरलूम चे वीज कनेक्शन जोडण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लाच मागितली होती. दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे महावितरण खळबळ उडाली आहे.