स्वतःमधील कलाकार ओळखता आला पाहिजे- सावंत

पठ्ठे बापूराव विद्यालय रेठरे ह. येथे शा. पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आपल्या प्रत्येकाच्या अंगी एक सुप्त कलाकार लपलेला असतो. आपल्या आवडीनिवडी वेळीच ओळखून त्याला वाचन-लेखनाची व सरावाची योग्य साथ मिळाली तर आपल्यातील कलाकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकट होऊ शकतो. जीवन समृद्ध करणाऱ्या एखाद्या कलेचा ध्यास जरूर घ्यावा, असे प्रतिपादन कवी, लेखक उत्तम सावंत यांनी केले. पठ्ठे बापूराव विद्यालय रेठरे ह. येथे शा. पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री सावंत म्हणाले, लोककलेमध्ये हिमालया एवढे काम केलेले अण्णाभाऊ साठे, सरोजिनी बाबर, पी सावळाराम यासारखे अनेक लोककलावंत, कवी, लेखक आपल्या बाळवा तालुक्यात होऊन गेलेले आहेत. समृद्ध असा लोककलेचा वारसा आहे तो आपल्याला जपता आला पाहिजे.

कमी शब्दात महत्वपूर्ण आशय वाचकापर्यंत पोहोचवण्यात कविता यशस्वी होताना दिसतात. बालसुलभ भावना अनेक बालकवितांमधून प्रकट होताना दिसतात अशा कवितांचे वाचन, गायन, लेखन आपण आवडीने करायला हवे. प्रारंभी मुख्याध्यापक श्री भोसले विद्यार्थ्यांनी लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे गण गवळण आणि लावण्या सादर केल्या.