दारुविक्रिच्या परवान्यांमध्ये वाढ? बियर शॉपींमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळण्याची शक्यता……

राज्यातील दारुविक्रिच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. १९७२ पासून दारुविक्रिच्या परवान्यांमध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याने, हे धोरण पुनरावलोकन करण्याची मागणी जोर धरत आहे.उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे बियर शॉपींमध्ये वाईन विक्रीची परवानगी तसेच नवीन मध्य विक्रिकरण्यांचे परवाने देण्याची विनंती करण्यात आली आहे.राज्यातील अनेक दारुविक्रेते आणि उद्योजकांनी उत्पादन शुल्क विभागाकडे बियर शॉपींमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

या निर्णयामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल, तसेच राज्याच्या महसुलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.१९७२ सालापासून राज्य सरकारने दारुविक्रीसाठी नवीन परवाने दिलेले नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनी वेळोवेळी सरकारकडे परवाने देण्याची मागणी केली आहे.

परवाने कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारुविक्री सुरू असल्याचेही निदर्शनास आले आहे. या समस्येवर उपाय म्हणून नव्याने परवाने द्यावे अशी मागणी प्रस्तावात आहे.उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे या मुद्द्यांवर निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला आहे. पवार यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असून, लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.