अयोध्येत सुरक्षा कडक व्यवस्था..

22 जानेवारीला अयोध्येतील श्री राम मंदिरात  प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. देशातील अनेक भागात या दिवशी उत्सवाचे वातावरण असेल. या दिवशी देशभरातून अनेक भाविक अयोध्येत येण्याचे नियोजन करत आहेत. अनेकांनी आधीच योजना आखल्या आहेत. या दिवशी अयोध्येतील सुरक्षा हे मोठे आव्हान असणार आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून झोनची विभागणी करण्यात आली आहे. अगदी सुईसुद्धा विनापरवाणगी आत नेता येणार नाही अशी हायटेक व्यवस्था प्रशासनाने केली आहे

प्राणप्रतिष्ठापूर्वी अयोध्येत सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था दिसत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येची रेड आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सध्या फक्त यूपी पोलीस यलो झोनमध्ये तैनात आहेत. राम मंदिर परिसर आणि काही भाग रेड झोनमध्ये आहेत. 14 जानेवारीनंतर त्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार तैनाती सुरू होईल

परमिटशिवाय बाहेरचे कोणतेही वाहन शहरात येऊ शकत नाही, अशी व्यवस्था अयोध्या प्रशासनाने केली आहे. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून यूपी पोलिस कर्मचारी तैनात आहेत. परमिट घेऊन प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपशीलवार माहिती रजिस्टरवर नोंदवली जात आहेत.