हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील आलोक आवळे यांच्या पोस्टातील खात्यावर अनोळखी खात्यावरून पैसे जमा झालेले होते. ही बाब त्यांच्या ज्यावेळी लक्षात आली त्यावेळी त्यांनी नरंदे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. सदर बाब पोस्ट मास्तर विशाल तपासे यांनी लक्षात घेऊन एएसपी इचलकरंजी व आयपीपीबी मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून ज्या व्यक्तीचे पैसे होते त्याच्या खात्यावर परत जमा केले. यासाठी आलोक आवळे यांच्या प्रामाणिकापणाबद्दल नरंदे पोस्ट ऑफिसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
अनोळखी खात्यावरून आलेले पैसे केले परत, नरंदेतील अलोक आवळे यांनी निर्माण केला वेगळा आदर्श
