सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मताधिक्य मिळाले आणि त्यांना आमदारकीचा मान मिळाला. नुकत्याच त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच त्यांनी हिवाळी अधिवेशनाल सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा देखील फोडलेली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी सांगोला तालुक्यातील अवैद्य वाळू उपसा तसेच इतर सर्व प्रकारचे अवैध बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून या व्यवसायामुळे तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे शांतता यामुळे भंग पावलेली आहे अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. या अवैद्य धंद्यामुळे तरुणाईचे भविष्य धोक्यात आल्याचे आले असल्याचे सांगून ते अवैध्य व्यवसाय बंद करण्यात यावी अशी मागणी त्यांनी विधानसभेमध्ये मांडली.
आमदार देशमुख यांनी अवैद्य बंदच्या केलेल्या मागणीनुसार सांगोला तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाने अलर्ट होऊन ॲक्शन मोडवर येणे गरजेचे होते. परंतु पोलीस आणि महसूल प्रशासन म्हणावे तसे ॲक्शन मोडवर आलेले दिसत नाहीत. एकीकडे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे सांगोला तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याचे मिशन तर दुसरीकडे कारवाईच्या बाबतीत प्रशासनाने नो ॲक्शन यावरून आमदार डॉक्टर देशमुख यांना प्रशासनाने हलक्यात घेतले असे तर नाही ना असा प्रश्न उभा राहिलेला आहे.
सांगोला तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे मिशन पूर्ण करण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनाच ॲक्शन मोडवर यावे लागेल तरच प्रशासन सरळ होऊ शकेल. येणाऱ्या काळात प्रशासन ॲक्शन मोडवर येते की आमदार देशमुख यांनाच स्वतः ॲक्शन मोड घ्यावा लागतो हे पाहणे खूपच उत्सुकतेचे असणार आहे.