अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. यामध्ये खून, मारामारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच अनेक अवैद्य धंद्यांना ऊत आलेला पाहायला मिळत आहे. जागोजागी अवैध धंदे राजेरोसपणे सुरू असलेले चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वाळवा तालुक्यातील शेगाव येथे देखील भवैद्य धंदे, मटका, जुगार, ऑनलाईन गेमिंग इत्यादी राजेरोसपणे सुरू आहेत.
हे अवैध धंदे बंद करून अवैद्य धंदे चालकांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन हे दलित महासंघ वायदंडे गटाचे वाळवा तालुका उपाध्यक्ष लखन आवळे यांनी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना दिले. सध्या अवैध धंदे हे राजेरोसपणे सुरू आहेत. या धंदे चालकांना कायद्याचे कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे याचा सर्वसामान्य लोकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
तसेच तरुण पिढीवर देखील याचा खूप वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे धंदेचालकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. आमच्या मागण्यांची दखल तत्काळ न घेतल्यास दलित महासंघाच्या वायदंडे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या.
