सांगलीची द्राक्ष बाजारात, ४ किलो पेटीचा दर 400 ते 480 रुपये

सांगली जिल्ह्यात जास्त द्राक्ष बागा आहेत.मात्र बदलत्या हवामानामुळे द्राक्षाच्या पिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या हंगामाला सुरुवात झाली असून चार किलोच्या पेटीला 400 ते 480 रुपये द्राक्षाला दर आकारण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वीस ते पंचवीस टक्के बागा डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काढणीला येतील असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.जिल्ह्यात द्राक्षांना चांगला दर मिळू लागला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार खुश आहेत मात्र बदलत्या हवामानाचा इतर बागांना मात्र फटका देखील बसत आहे.