डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे.

या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्ल्तील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे.

त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. अर्थतज्ज्ञ ते पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.