इचलकरंजी येथील पश्चिम महाराष्ट्र पटसोंगटी फेडरेशनच्या वतीने रविवारी (ता. २१) भव्य पटसोंगटी स्पर्धा होणार आहेत. गावभागात जय भवानी व्यायाम मंडळ येथे रात्री नऊ वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल.
प्रथम १५,०५१ रुपये व चषक, द्वितीय १०,०५१, तृतीय ७,०५१ रुपये व चतुर्थ क्रमांकासाठी ५,०५१ रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जयभवानी व्यायाम मंडळ, आप्पा ग्रुप पटसोंगटी मंडळ, जी. एम. ग्रुप, एस. एम. ग्रुप यांच्यासह संयोजकांनी केले आहे.