इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे झाल्यामुळे शहरातील सौंदर्यात भर पडलेली आहे. आमदार राहुल आवाडे यांनी आमदार पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदार डॉ. राहुल आवडे आपल्या स्वखर्चातून आमराई रोड परिसरात सोलर हायमास्ट दिवे बसविणार आहेत. इचलकरंजी येथील आमराई रोड परिसरात असलेल्या माऊली मंदिराच्या पायाभरणीचा व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या स्वखर्चातून बसविण्यात येत असलेल्या सोलर हायमास्ट दिव्यांच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास ह.भ.प. सदाशिव उपाशे महाराज, भगतरामजी छाबडा, राहुल घाट, नागेश पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक, समाजबांधव आणि मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या उभारणीमुळे परिसरातील भक्तगणांना एक पवित्र धार्मिक व आध्यात्मिक केंद्र लाभणार असून, सोलर हायमास्ट दिव्यांमुळे परिसर प्रकाशमान होणार आहे. माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांनी मंदिर उभारणी व सौर ऊर्जा उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.