गावाचा विकास करण्याच्या हेतूने प्रत्येक नेतेमंडळींचे प्रयत्न सुरु असतात. सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी, गावचा विकासासाठी नेत्यांकडून अनेक विकास निधी मंजूर देखील होतात.ज्यामुळे गावच्या सॊदर्यात भर पडते.खास. धैर्यशील माने यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत आष्टा येथील दरेजबुवा चौक ते गणपती रोड या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे साडे आठ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. येथील दरेजबुवा चौक ते गणपती रोड या रस्त्याच्या डांबरी करणाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी वीर कुदळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून आणला.
यावेळी आष्टा शहारातील अनेक पायाभूत विकास कामांसाठी खास. धैर्यशील माने यांच्या सहकार्याने राज्य व केंद्र शासनातर्फे भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच रस्ते, गटारी व काँक्रीटीकरणाची कामे दर्जेदार होण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक अमोल पडळकर, दिलीपराव वग्याणी, दिलीप कुरणे, संजय कोटिवाणी, अभिजीत वाडकर, राजकुमार सावळवाडे, गणेश माळी, पांडुरंग बसुगडे, अभिजित बिरनाळे, देवचंद्र आवटी, सुरज उंडाळे, सागर परीट, जगोंडा वाडकर, आण्णा वाडकर, अशोक मगदूम, अभिजित खुडे, अभय आडके आदी नागरिक उपस्थित होते.