आष्टा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधून रायगड परीवार सांगली विभाग आणि आष्टा शहरातील विविध सामाजिक संस्था व गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराचे उद्घाटन संग्राम जाधव आणि अमित ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. महिला रक्तदात्यांचा सहभागही उल्लेखनीय होता.
महाराष्ट्रात वा रायगड परिवारातर्फे संवर्धन मोहीमांचे फोटो प्रदर्शन करुन गडकोट संवर्धन कार्याचे महत्व सांगण्यात आले. यावेळी संग्राम जाधव, अमित ढोले, महेश पाटील, विनायक भोई, राजकेदार आटूगडे, धनाजी जाधव, दत्तत्राय मस्के, विश्वजित पाटील, प्रमोद आटुगडे, बा रायगड परिवाराच्या वैशाली सोनवणे, अमित जामदार, सत्यजित पवार, सौरभ महाडिक,जीवन काळोखे, अभिजित गोरे, प्रतीक पवार उपस्थित होते. आभार धनाजी जाधव यांनी मानले.