हातकणंगले तालुक्यात धार्मिक भावनेचे लोक आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमात लोकांची उपस्थिती भरपूर पाहायला मिळते. हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नरंदे येथील महादेव माने परिवाराच्यावतीने सदर पालखीचे स्वागत करण्यात आले.
सदर पालखीच्या दर्शनासाठी आम. अशोक माने, खास. धैर्यशील माने तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली. यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी दर्शनासाठी कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती नरंदे येथे दाखवली होती. सदर पालखीच्या आगमनाच्या वेळी फटाक्याची आतीषबाजी व ढोल ताशांच्या गजराने परिसरातील वातावरण धार्मिक बनले होते.
