चार लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त! सांगोला पोलिसांची दमदार कामगिरी

अलीकडच्या काळात गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. खून, मारामारी, चोऱ्यांच्या प्रमानात दिवसेंदिवस वाढ होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. सांगोला तालुक्यात देखील चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. सांगोला पोलीस ठाणे गु. र. नं. ९५२/२०२४ बी एन एस कलम ३०३ (२) मधील कडलास नाका सांगोला येथे लावण्यात आलेला फिर्यादी रविंद्र विठठल महंकाळ रा. कडलास यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम एच ४५ ए क्यू ६८२३ असे चोरी झालेबाबत सांगोला पोलीस ठाणेस अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हे दाखल होते. सदरच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगोला पोलीसांना निर्देश दिले होते.

या अनुंशगाने सांगोला पोलीस ठाणेस वरील दाखल गुन्हयाचा तपास करीता असताना तात्रिक व सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे मंगल कार्यालय येथे चोरी करणारे आरोपी हे सांगोला पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता त्याचे नांव नईम अमीर तांबोळी, रा. दिघंची ता. आटपाडी सध्या रा. कडलास रोड, खंडागळे हॉस्पीटल जवळ सांगोला, सुहानी पिराजी सावंत, रा. भिमनगर, सांगोला ता. सांगोला यांची नावे निष्पन्न करुन त्यातील आरोपी नईम अमीर तांबोळी यास अटक करण्यात आली आहे.

तसेच नईम तांबोळी याने पोलीस चौकशी दरम्यान कडलास नाका सांगोला येथुन फिर्यादी रविंद्र विठठल महंकाळ रा. कडलास यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नं. एम एच ४५ ए क्यू ६८२३ हा त्याचा मित्र बबलु भोसले रा. परिटगल्ली, सांगोला, ता. सांगोला याचे सोबत मिळून चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपी नईम तांबोळी याचेकडून सदरचा ट्रॅक्टर व सोन्याचे गंठण असा सुमारे ४,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सांगोला पोलीस ठाणे हददीत चोरीच्या घटना पाठीमागील काही दिवसात घडलेल्या असून पोलीस अंमलदाराची प्रभावी गस्त करण्यात येत असुन पोलीस ठाणे हददीत वेगवेगळ्या ठिकाणी रात्रगस्त, नाकाबंदी नेमण्यात येते यामुळे काही दिवसापासून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनाना आळा बसला असुन यापुढे ही प्रभावी गस्त ठेवण्यात येणारआहे व अजुन अशा प्रकारचे चोरी करणारे टोळींना जेरबंद करून चोरीच्या घटना उघडकीस आणण्यात येणार आहेत. तसेच सांगोला शहर हददीतील आठवडा बाजारामध्ये मोबाईल चोरी बाबत पोलीसांनी साध्या वेशात गस्त ठेवत मोबाईल चोरी घटनावर प्रतिबंध करीत आहेत.